मित्रहो,
प्रत्येक सी. एफ. एल. आणि ट्युब लाईट मध्ये प्रकाश उत्पादन करण्यासाठी पार ह्या धातूचा वापर केला जातो. पारा हा फ्लुरोसेंत लाईट मधला महत्वाचा भाग आहे. पारा हा जड धातू (heavy metal) मानला जातो. विश्व स्वस्थ संगठ्नेने (WHO) सुद्धा पारयाला विषारी धातू म्हणून घोषित केलेले आहे.
हा धातू सामान्य तापमानास द्रव रुपात असतो तर थोड्या ज्यास्त तापमानाला तो वायूत रुपांतरीत होतो. जो आपल्या श्वासातून शरीरात गेल्यावर खूप हानिकारक ठरू शकतो.
सी. एफ. एल. किंवा ट्युब लाईट च्या वापराने विजेची बचत होते हे खरे पण जर ज्यास्त पारा असलेले सी. एफ. एल. किंवा ट्युब लाईट वापरले आणि वापरून झालेले बल जर अपघाताने बंद खोलीत फुटले तर त्यात असलेल्या पा-या मुले आपल्याला, खासकरून लहान मुलांना व पर्यावरणाला धोका होण्याची शक्यता जास्त आहे.
जर लहान मुले ह्या पारयाच्या संपर्कात आली तर पारा त्यांच्या शरीरात जाऊन काही इंद्रियांवर घातक परिणाम करू शकतो, त्याचबरोबर, स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्याची क्षमता कमी होणे, बुध्यांक कमी होणे ह्या सारखे दुष्परिणाम उध्भवण्याची शक्यता असते.
म्हणूनच सी. एफ. एल. किंवा ट्युब लाईट ह्यांचा वापर करणे जरी योग्य असले तरी उपयोगानंतर, निकामी झालेल्या सी. एफ. एल. व ट्युब लाईट चे प्रबंधन करणे महत्वाचे झाले आहे. अजूनही भारतात ह्यासाठी काही तंत्रज्ञान नाही. काही सरकारी संस्था निकामी झालेल्या सी. एफ. एल. व ट्युब लाईट चे प्रबंधन कसे करायचे ह्यासाठी काम करीत आहे. *
*
*आपला
*डॉं. प्रशांत राजनकर, *