Thursday, June 21, 2018

दुधीचा रस का आहे घातक, वाचा....

नमस्कार मित्रांनो, आज मला सोशल मिडिया वर खालील बातमी वाचायला मिळाली, ती जशीच्या तशी आपल्या माहितीसाठी प्रस्तुत करीत आहे व त्यातील मजकुर बद्दल कुणाला काही आक्षेप असल्यास मला  prashantrajankar @gmail.com वर मला कळवा

धन्यवाद
आपला
डॉ प्रशांत राजनकर
9650745900

दुधीचा रस पिल्याने पुण्यात 41 वर्षीय महिलेचा मृत्यू; दुधीचा रस का आहे घातक, वाचा....
दिव्यमराठी वेब टीम | Jun 21,2018 11:40 AM IST

पुणे- दुधीचा ग्लासभर रस पिल्याने पुण्यात एका 41 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिलेला इतर कोणत्याही आजार नसताना केवळ दुधी रस पिल्यानंतर आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दुधीचा रस पिताना खबरदारी घेण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

याबाबतची माहिती अशी की, 41 वर्षीय महिलेने 12 जून रोजी एक ग्लास दुधीचा रस घेतला. यानंतर तासाभरात तिला उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. रूग्णालयात दाखल केल्यानंतरही तिची प्रकृती खालावत गेली. अखेर तीन दिवसानंतर 16 जूनच्या मध्यरात्री शरीरांतर्गत गुंतागुंतीमुळे संबंधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, दुधीचा रस प्यायल्यानंतर मृत्यू होण्यापासून विविध त्रास होण्याच्या घटना यापूर्वी देशभरातून समोर आल्या आहेत. दुधीचा रस कडू लागल्यास तो पिऊ नये, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या समितीने 2011 मध्येच सांगितले आहे. कडू दुधीतील काही घटक व संयुगांमुळे मृत्यू ओढावू शकतो, असे या समितीने सांगितले होते.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे उपसचिव तसेच शास्त्रज्ञ सुशीलकुमार सक्सेना (59) यांचा जून 2010 मध्ये दुधी भोपळ्याचा रस प्यायल्यानंतर अत्यवस्थ झाल्यानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता. सक्सेना यांचा मृत्यूची गंभीर दखल घेण्यात येऊन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तज्ज्ञांची एक विशेष समिती स्थापन केली होती. ‘भाजीपाल्याच्या, विशेषत: दुधी भोपळ्याच्या रसाची सुरक्षितता’ हाच या समितीच्या संशोधनाचा विषय होता.

इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चमधील शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे की, दुधी रस प्यायल्यामुळे मृत्यूच्या इतक्या घटनांची माहिती आमच्याकडे आली आहे, की हा न पिणेच चांगले- विशेषत: चवीला तो तुरट, कडवट लागत असेल तर असा दुधी रस अजिबात पिऊ नका.

प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांनाही तीन-चार वर्षांपूर्वी दुधीचा रस प्यायल्यानंतर त्रास झाला होता. रूग्णालयात दाखल केल्यानंतर सुदैवाने त्यांच्या प्रकृतीत लागलीच सुधारणा झाली होती.

दुधीच्या रसावर संशोधन सुरूच-

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमधील शास्त्रज्ञ तसेच संशोधन समितीतील सदस्य जी. एस. तोटेजा यांनी भोपळा रसबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून लेखी स्वरूपात त्या-त्या केसेसची माहिती मागवली होती. रस घेतल्यानंतर दुष्परिणाम ओढवलेल्या लोकांकडूनही त्यांचे अनुभव लिहून मागवले होते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा तसेच विद्यापीठांनाही ‘दुधी भोपळ्याच्या रसाचे परिणाम’ या विषयावर आणखी संशोधन करायला सुचविले आहे.

अतिरिक्त टीटीसीमुळे उद्भवतो धोका!

कितीतरी गुरू, बाबा आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ दुधी भोपळ्याचा रस पिण्याची शिफारस करतात. विशेषत: मधुमेह्यांना हा सल्ला आवर्जून असतो. त्यांचा सल्ला शिरोधार्य मानून लोक घरीच रस तयार करतात व पितात. दुधी भोपळा, भोपळा, काकडी, कलिंगड, टरबूज आदींमध्ये टेट्रासायक्लिक ट्रिटरपिनॉईड क्युकरबिटॅसिन नावाचे रासायनिक मूलद्रव्य असते. त्यामुळे हे सारे पदार्थ काहीसे तुरट, कडवट लागतात. या रासायनिक मूलद्रव्यांचे विषात रूपांतर होऊ शकते. विशेषत: या पदार्थांचा रस मोठ्या प्रमाणावर प्यायल्यास हा धोका अधिक असतो.



Credit-दिव्यमराठी वेब टीम  and Times of India

No comments:

Popular Posts

Pages

पुनर्चक्रित प्लास्टिक की जहरीली सच्चाई का खुलासा

  प्लास्टिक प्रदूषण एक वैश्विक संकट बन गया है, हमारे पर्यावरण में प्लास्टिक की सार्वभौमिक उपस्थिति से पारिस्थितिकी तंत्र और मानव स्वास्थ्य प...